पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील पुण्यस्मरण विशेष


शब्दांकन आणि  संकलन -- महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील हातनुर, ता.तासगाव,जिल्हा-सांगली.
सांगली:
           1 मार्च 1989 वार बुधवार इयत्ता पहिलीत होतो....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री...
सांगली जिल्हयाचे सुपुत्र...
सांगली जिल्ह्याचा एक आणि एकच
ढाण्या वाघ....
राजस्थानचे माजी राज्यपाल....
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष.....
 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस.....
राज्य साखर कारखाना संघ अध्यक्ष....
राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ अध्यक्ष....
राज्य सहकारी बँक अध्यक्ष
अशा महाराष्ट्रातील सर्व मोठया
 संस्थांचे माजी अध्यक्ष....
भारतीय स्वातंत्र्य लढयात
सक्रिय सहभाग घेतलेले....
गोळ्या झेललेले.....
भर बाजारादिवशी तुरुंग
फोडलेले क्रांतिकारक.....
दक्षिण साताऱ्याचा सांगली
जिल्हा तयार करणारे.....
मुंबईमध्ये मराठी माणसांची संघटना म्हणून शिवसेना उभी करण्यास बाळासाहेबांना लागेल ती सर्व  मदत केलेले....
 सांगली जिल्हयाचे कर्तबगार नेतृत्व.....
ज्यांच्या घरी गेलं की
हमखास नोकरी मिळायची.....
ज्यांचा शब्द अंतिम मानला जात होता.....
अनेकांना ज्यांनी शैक्षणिक कामासाठी बोट दाखवेल त्या ठिकाणी एक रुपया एकर दराने शासकीय जागा दिल्या.....
ज्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वसामान्यांसाठी खुली केली....
 आशिया खंडातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना चालू केला....
ज्यांच्यामुळे राजधानी दिल्लीत सांगली अपार्टमेंट आहे.....
दिल्लीत सांगलीचे नाव आजही आहे.....
महाराष्ट्र सदनाजवळ सांगली कॉलनी आहे.....
ज्यांच्या नावाच्या महाविद्यालयामध्ये पाच वर्ष शिकता आले....
त्या लाडक्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांचं आजच्या दिवशी
निधन झालेलं होतं....
शाळांना सुट्टी देण्यात आली होती व 2 मार्च 1989 आम्ही शेजारच्या एका घरामध्ये त्यांचे अंतिम संस्कारविधी थेट प्रक्षेपणाने पाहिले होते......
स्वर्गीय दादांच्या बद्दल हृदयामध्ये एक कप्पा कायमचा राहिला.....
हातनुर च्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटनासाठी शालिनीताई यांच्याबरोबर ते हेलिकॉप्टरने हातनुर मध्ये आले होते.....
त्यांच्या जन्मदिनी 13 नोव्हेंबर 2009 ला पुन्हा ठाणे जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात बदलून येता आले......
ठाणे जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना....
 मुंबई अहमदनगर हायवेच्या दक्षिण बाजूला...
सह्याद्री पर्यंत  मोठा डॅम बांधलेला...
 महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री शांताराम भाऊ घोलप यांच्या धसई  गावापासून थोड्या अंतरावर होता आणि आम्ही त्यावर फिरायला जायचो....
 26 जुलै 2005 रोजीच्या ऐतिहासिक अतिवृष्टीच्या दिवशी मी अहमदनगरचे रोहिदास तांदळे सर त्या डॅमवर होतो......
 त्याच्या पायाभरणीची पाटी होती......
उद्घाटक होते वसंतरावदादा  पाटील .....
हिमालया एवढ्या दादांनी सह्याद्रीच्या उंचीची अनेक माणसे उभी केली.......
दादांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.........