लाॅकडाऊनच्या काळात शेतकर्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान शासनाने पिकांच्या खर्चाची भरपाई द्यावी : शेतकर्यांची मागणी
म्हासुर्णे:- तुषार माने
खटाव तालुक्यातील चोराडे येथील शेतकर्याच्या शेतामध्ये केलेल्या साडेचार एकरातील भोपळ्याच्या रानात लाॅकडाऊनच्या काळात मार्केट बंद असल्यामुळे रोटर फिरवावा लागल्यामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान
मोठयाप्रमाणात झाले आहे.
जाहिरात
तरी लाॅकडाऊनच्या काळात ज्या शेतकर्यांचा शेतमाल खराब झाला आहे अशा शेतकर्यांना शासनाने पिकांच्या खर्चाची भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरीवर्गातुन होत आहे.
चोराडेतील शेतकर्यांने अशोका कंपनीचे बियाणे वापरुन भोपळा पिकांची लागण जानेवारी महिन्यात केली होती.तरी थंडीच्या महिन्यामध्ये या पिकावर अनेकअौषधाच्या फवारण्या व रिंग पद्धतीने खत घालुन हे पिक जोमाने आणले होते.
प्रतिकिया
सध्या लाॅकडाऊनच्या काळात अनेक शेतकर्यांना आपल्या पिकांचा उत्पादन खर्च ही निघालेला नाही त्यामुळे याबाबत राज्य सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातुन चौकशी करुन या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबतची पावले उचलावीत अशी अपेक्षा शेतकरीवर्गाकडुन व्यक्त होत आहे.लाॅकडाऊन मुळे भोपळयाचे दर दोन ते तीन रुपयेच्या घरात येऊन बसलेत.भोपळ्याचा वापर मोठया प्रमाणात हाॅटेल मध्ये वापरला जातो.तसेच या भोपळयाची मागणी वाशी मार्केट ला जास्त असते.कोरोना सदृश्य परिस्थतीमुळे भोपळा जनावरांना घालावा लागला आहे.आणि राहिलेला भोपळ्यावर रोटर फिरवावा लागल्याने आम्हाला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाय योजना काढले गरजेचे आहे.
महेश पिसाळ,भोपळा उत्पादक चोराडे.
0 Comments