म्हासुर्णे प्रतिनिधी (तुषार माने)
       - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लॉकडावुन झाला असुन अनेकांना घरात थांबावे लागत असल्याने व जवळची पुंजी संपल्याने अनेकांची उपासमार होवु लागली आहे.या गोरगरीबांची उपासमार होवु नये म्हणून यशश्री महिला गटाच्या माध्यमातून व मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर युवा मंच व राज सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत भोजन पँकेट देण्याची व्यवस्था केली आहे.
      यशश्री महिला बचत गट,मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर युवा मंच ,राज सामाजिक संस्था या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असुन सध्याची परिस्थिती पाहुन सरकारची मदत न घेता मोफत अन्नदान लॉकडावुन पर्यत चालणार आहे.
      या मोफत भोजनामध्ये भात शिरा,व तुरडाळीची वरण हे जेवण एका चांगल्या सद्रुढ आचारीकडुन बनवुन आजच्या काळात हे कार्यकर्ते सोशल डिस्टींग पाळुन सर्व कामे करीत आहे .जे लोक घरी आहेत त्यांना ही घरपोच जेवन दिले जात आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजु कचरे यांनी बोलताना सांगितले गावात सक्षम दानशुर व्यक्ती लोक पुढे येवुन अन्नदान करीत आहेत.जोपर्यंत लॉकडावुन असेपर्यत अन्नदान सुरुच रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       या केद्राचे उद्घाटन सौ.उर्मिला येळगावकर,सौ.निता गुदगे,अश्विनी पुस्तके,सौ.रजनी पुस्तके,नंदा चन्ने,सौ.पल्लवी गुदगे,डॉ.दिलीपराव येळगावकर,नितिन शेंडगे,जगन्नाथ भिसे,दिलीप पुस्तके अनेक कार्यकर्ते पोलीस उपनिरिक्षक शहाजी गोसावी,पोलीस पाटील प्रशांत कोळी उपस्थित होते.