कराड :सुरज घोलप बाबा 
             समता सामाजिक विकास संस्था कराड यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त कराड नगरपालिकेचे आरोग्य  कर्मचारी यांनी  कोरोना पार्श्वभूमीवरती मयत रुग्ण अंत्यविधी करताना  स्वतःची काळजी घेऊन  उल्लेखनीय  कामगिरी केल्याबद्दल यांचा आज विशेष स्मृतिचिन्ह देऊन सत्कार माननीय श्री विजय वाटेगावकर नियोजन सभापती  नगरसेवक बडेकर कोयना बँकेचे उपाध्यक्ष व संस्थेचे सदस्य श्री विजय मुठेकर तसेच आरोग्य विभागाचे निरीक्षक श्री मिलिंद शिंदे व संस्थेचे सदस्य दिनेश चांडक यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी रामा भिसे योगेश कांबळे मनोज गायकवाड परशुराम अवघडे भगवान भिसे सतीश भिसे भास्कर काटरे  व  नागरिआरोग्य केंद्र आरोग्य सेविका संजीवनी सातपुते होम कॉर्न टाईम विशेष उल्लेखनीय कामाबद्दल यांचाही सत्कार करण्यात  आला.

यावेळी मुकदम मारुती काटरे यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव लादे माजी नगरसेवक म्हणाले आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले हे एक काम उल्लेखनीय आहे व आपली सेवा ते प्रामाणिकपणे देशाच्या सेवेसाठी करीत त्यामुळे मुख्याधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार आरोग्य कर्मचारी नी सुद्धा स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन सेवा बजवावी असे सांगण्यात आले तसेच आरोग्य कर्मचारी रामा भिसे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये नियोजन सभापती विजय वाटेगावकर व बेडेकर मेहरबान व मुख्याधिकारी साहेब यांचे  पाठबळ आहेच पण स्वतः आरोग्य कर्मचारी असल्यास सारखे आमच्या बरोबरीने काम करीत असतात असा उल्लेख केला यावेळी आभार भोसले यांनी मानले