भिलवडी पोलीसांची संचारबंदी कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई
भिलवडी:-(सिद्धार्थ कुरणे )
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने राज्यात संचारबंदी लागू केली असताना, ग्रामीण भागातील लोकांना याचे गांभीर्य दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने लोकांना वारंवार सुचना करूनही नागरिक संचारबंदीचे तीनतेरा वाजवत असल्यामुळे भिलवडी पोलीसांनी अखेर कायदयाचा बडगा उगारला असून, कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून भिलवडी स्टेशन,वसगडे, अंकलखोप फाटा व आमणापूर पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. जगाची झोप उडविलेल्या या कोरोना व्हायरसच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. प्रशासनाने लावलेल्या १४४ कलमानंतर ही अत्यावश्यक सेवेचा आधार घेवून जनता खुलेआम रस्त्यावरून फिरत आहे.पोलीसांनी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने त्यांच्यावर कायदयाचा बडगा उगारत संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरिक्षक विशाल जगताप यांनी स्वतः भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये रस्त्यांवरून फिरून लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले परंतु काही लोकं शासनाने घोषीत केलेल्या संचारबंदीचे व मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. अशा लोकांवर भिलवडी पोलीसांनी संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तब्बल पंधरा गुन्हे दाखल केले आहेत. बाहेरगावावरून येणारे लोक व वाहने यांची तपासणी करणे करीता भिलवडी स्टेशन,वसगडे, अंकलखोप फाटा व आमणापूर पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचाया प्रसार होवू नये याकरीता महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून स्वतःच्या आरोग्याची दक्षता घ्यावी..शासनाच्या आदेशाचे उलघन करणाऱ्यांची गई केली जाणार नाही भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग यांनी दिला आहे.
0 Comments